देशात शाह आणि तानाशहाचे राज्य : मोहन प्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

परभणी येथे कॉंग्रेसचे जिल्हास्तरीय शिबिर संपन्न





परभणी : देशात सध्या शाह आणि तानाशाहचे राज्य असून हे सरकार गरिबांच्या हिताचा विचार न करता फक्त देशातील काही उद्योगपतींचाच विचार करून आपली ध्येय धोरणे ठरवत आहे. त्यामुळे जोपर्यंत मोदींना सत्तेवरून दूर करत नाही, तोपर्यंत जनतेचे अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. परभणी येथे आयोजित कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील याठिकाणी उपस्थित होते.

भाजपने मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली पण सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. सबका साथ सबका विकास अशा घोषणा देऊन मोदींनी सत्ता मिळवली मात्र सत्तेवर आल्यावर भाजपचे खासदार मुस्लीमांनी या देशात राहू नये असे म्हणतात तर केंद्रीय मंत्री संविधान बदलण्याची भाषा करित आहेत. देशातली लोकशाही मोडून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून देशातील महत्त्वाच्या संस्थावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या नियुक्त्या करून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका यावेळी भाजपवर करण्यात आली.
तसेच चव्हाण यांनी देखील भाजप सरकारवर चांगलेच तोंडसुख घेत सरकारवर निशाणा साधला. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. आश्वासन देऊनही सरकारने शेतीमालाला हमीभाव दिला नाही आता निवडणुका समोर दिसायला लागल्याने मतांसाठी पुन्हा जुमलेबाजी सुरु करून हमीभावाचे आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा देणे आणि भाषणे करण्याशिवाय काहीच करत नाहीत. जनतेला आता सरकारवर विश्वास राहिला नसून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@