मोदी सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा - अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

 
अहमदनगर - मोदी सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. सर्वसामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागावा? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी अजित पवार यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी आमदार सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.
 
अजित पवार यावेळी म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांचेही पंचनामे सरकारने नीट केले नाही तसेच कर्जमाफी, बोंडअळी, गारपीट या सर्व मुद्द्यांवर शिवसेना कोणतीही भूमिका का घेत नाही? शिवसेना दुटप्पी राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला.
 
तसेच आधी विजय माल्या कर्ज बूडवून परदेशी पळाला आणि आता नीरव मोदींनी बँकेचे पैसे बुडवले, भ्रष्टाचारमुक्त देश करू, असे भाजप नेते म्हणत होते, यांचे सरकार आल्यापासून देशात मोठे घोटाळे होत असल्याचीही टीका यावेळी अजित पवार यांनी भाजपवर केली.
 
सुनील तटकरे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरलेले हे सरकार फक्त लोकांची फसवणूक करण्यात यशस्वी झाले आहे. असे म्हणत सरकारविरोधात जनमानसाला संघटित करण्याचा प्रयत्न या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत असेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@