संघ सीमेवर काय करेल याची कल्पनाच बरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

 धनंजय मुंडे यांची खोचक टीका 





श्रीगोंदा :
'संघाची संपूर्ण कार्यपद्धत ही मला चांगलीच माहित असून संघ सीमेवर युद्धस्थितीत काय करेल याची नुसती कल्पनाच केले बरी' अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे. श्रीगोंदा येथे हल्लाबोल यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात कि, युद्धजन्यस्थितीमध्ये ज्याठिकाणी सैनिकांना प्रशिक्षण घेण्यास सहा महिने लागतात त्याठिकाणी संघाचे स्वयंसेवक हे देश रक्षणासाठी अवघ्या तीन दिवसांमध्येच तयार होतील. परंतु संघाची कार्यपद्धत ही काय आहे, ही मला चांगलीच माहित असून स्वयंसेवक सीमेवर काय करतील याची कल्पनाच केलेली बरी' अशी खोचक टीका मुंडे यांनी यावेळी संघावर केली.


तसेच शेतकरी कर्जमाफीवरून देखील संघ आणि भाजपला लक्ष करत, संघात कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना बऱ्याच शब्दांचे अर्थच काळात नाहीत असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील सामन्य शेतकरी आणि ग्रामीण जनतेनी 'सरसकट' कर्जमाफी मागितली. पण संघातील लोकांना ग्रामीण भागातील 'सरसकट' हा शब्दच मुळात माहित नसावा, असे कर्जमाहित दिसून आले आहे, अशी टीका मुंडेंनी केली.




याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी सत्ते येण्याअगोदर राज्यातील नागरिकांना दिलेले एकही आश्वासन पाळले नसून राज्यातील ओबीसी, धनगर, दलित आणि मुस्लीम समाजाची पूर्णपणे फसवणूक केली आहे. त्यामुळे या राज्याला पुन्हा एकदा अजित दादा आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची गरज आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@