‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ अहवाल सादर करा : आयुक्त तुकाराम मुंढे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ’स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेले विविध प्रकल्प आणि कामांबाबतचे सविस्तर लाइफ सायकल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील विविध विकासकामांचा आढावा घेताना दिले आहेत.
आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी दिवसभर खातेप्रमुख आणि विविध खात्यांमधील कामकाजाचा आढावा घेतला.
 
 
त्यात ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील विविध प्रकल्पांचे सादरीकरण त्यांच्यासमोर झाले. ‘स्मार्ट सिटी’ कंपनीमार्फत राबविण्यात येणार्‍या योजना व प्रकल्पांचा अहवाल तयार करण्यात येणार असून प्रत्येक योजना कशा पद्धतीने पूर्ण करता येईल, त्यासाठी किती कालावधी लागेल, निधीची तरतूद आहे का? यासह विविध बाबींचा समावेश करण्यास त्यांनी सांगितले आहे. डेट्रा ड्रायव्हन सिटी फोरमच्या अहवालाचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंग धोरण ठरविण्याच्या दृष्टीने त्यांनी माहिती घेण्यास सांगितले. स्काडा यंत्रणेंतर्गत शहरात वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. पाण्याची गळती थांबावी आणि प्रत्येक मीटरचे बिलिंग होण्याच्या दृष्टीने स्काडा वॉटर मीटरची उपयुक्तता तपासण्याचे आदेशही त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सहा कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या. यामध्ये बांधकाम विभागाच्या दोन, तर आस्थापनाच्या तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एका कार्यकारी अभियंत्यालाही नोटीस बजावली असून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले आहे.
 
 
अनधिकृत बांधकामे हटविली
 
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल नाशिकरोड न्यायालय परिसरात १५ वर्षांपासून असलेले अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश देत सकाळी अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. खासगी मालकीच्या भूखंडावर आढळून आलेला कचरा का साफ होत नाही? अशी विचारणा करत कचरा साफ करून संबंधित मालकास नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आज मुंढे यांनी नाशिकरोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@