क्रीडांगण विकासासाठी सव्वा तीन कोटी खर्चास स्थायीची मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या दि.१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत क्रीडांगण विकासासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये आगरटाकळी शिवार आणि प्रभाग क्रमांक २३ मधील दोन क्रीडांगणे विकसित होणार आहेत.
 
स्थायी समितीची साप्ताहिक सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ३ कोटी २३ लाख रुपये खर्चाचे क्रीडांगणे विकसित करण्याचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. त्यात, प्रभाग क्रमांक १६ मधील आगरटाकळी शिवारातील स.नं. २९ (पै) येथील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करणे, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २३ मधील मंजूर अभिन्यासातील दोन खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करणे या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
याशिवाय, नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २० मधील शिखरेवाडी क्रीडांगणाची दुरुस्ती करण्यासही ४४ लाख ९९ हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. दरम्यान, पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराच्या चौकशी अहवालाचे काय झाले, असा सवाल सूर्यकांत लवटे यांनी उपस्थित केला. त्यावर, सभापती गांगुर्डे यांनी नवीन आयुक्त त्यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्यामकुमार बडोदे यांनी खासगी जागांमध्ये उभ्या असलेल्या अनधिकृत शेड हटविण्याची मागणी केली.
 
 
एलईडीबाबत नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून दिलेले प्रस्ताव रोखून धरण्यात आल्याबद्दल सूर्यकांत लवटे यांनी जाब विचारला. तर प्रवीण तिदमे यांनी १२ जानेवारी नंतरच्या कामांबाबतचे आदेश असल्याने त्यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेनुसार कामे करण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@