जिल्हा परिषदेतील कालबद्ध पदोन्नतीत गोलमाल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जवळपास दोनशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित राहण्यासाठी काय कारण आहे, याबाबत चर्चा सुरू असून यात काही गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिक लेखानिधी शाखा असो की विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावरून दरम्यानच्या काळात झालेल्या लेखापरीक्षणातही पदोन्नतीच्या मुद्द्यावर आक्षेप नोंदविण्यात न आल्याने संशयाचे धुके दाटले आहे.
 
वर्ग तीन आणि चारमधील कर्मचार्‍यांना सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षांनी पहिली तर नंतरच्या बारा वर्षांनी दुसरी कालबद्ध पदोन्नती दिली जाते. वेतनात एक ते दीड हजार रुपयांची वाढ होत असल्याने संबंधित कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर खर्‍या अर्थाने या पदोन्नतीचा लाभ होत असतो. दोनशे कर्मचार्‍यांना मात्र सेवानिवृत्तीनंतरही या पदोन्नतीचा लाभ मिळू शकला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पदोन्नतीचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांचा गोपनीय अहवाल सादर करणे महत्त्वाचे आहे. पण, गोपनीय अहवाल लिहिणार्‍या अधिकार्‍यांनी या कामी अडवणूक केल्याचे बोलले जाते.
 
पदोन्नती दिली गेली असती तर सेवापुस्तकात नोंद झाली असती. अर्थात सेवापुस्तकात कर्मचार्‍यांच्या सेवेसंबंधी सर्वच प्रकारची माहिती सेवापुस्तकात नमूद केली जाते. दोनशे कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तकात तशी नोंदच नव्हती, असे समजते.
 
@@AUTHORINFO_V1@@