देशभक्तीचा धर्म आणि धर्मवाद्यांची देशभक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
राजधर्म आणि धर्मराज या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सत्ताधाऱ्याचा धर्म हा राष्ट्राच्या अन् रयतेच्या रक्षणाचा, विकासाचा अन् सार्वभौम प्रगतीचाच असतो. धर्मवादी आणि धर्मशीलांची देशभक्ती हा वेगळा विषय असू शकतो. त्यांच्या चौकटीही आखलेल्या असतात. धर्म जे काय सांगतो अन् मुळात धर्माच्या सांगण्याचे सोयिस्कर अर्थ लावून त्यानुसार राष्ट्रधर्म धर्मांध लोक तयार करत असतात. जग या अतिरेकी धर्मांधामुळे वेठीस धरले गेले आहे. अगदी पॅरिसपासून शांघायपर्यंत साऱ्यानाच या कट्टरवाद्यांच्या अतिरेकी कारवायांचा त्रास होतो आहे. असुरक्षिततेची भावना पसरली आहे. जगाची चिंता आज दहशतवाद हीच आहे. या कट्टरवाद्यांचा धर्म शोधायला गेल्यावर ओवैसी आणि त्यांच्यासारखेच अनेक ‘विचारवंतङ्क सर्वधर्मसमभावाचा आव आणतात. अतिरेक्यांना जात नसते, दहशतवाद्यांचा कुठला धर्म नसतो, असले सुविचार त्यांना सुचतात. त्याच्या उद्घोषणा ते करत असतात. त्याला त्यांच्याच विचारांचे अन् आचाराचे अनेक लोक टाळ्याही वाजवीत असतात.
 
राष्ट्रवाद मांडणाऱ्याना धार्मिक कट्टरवादी ठरवून ते मोकळे होत असतात. आपली ती अभिव्यक्ती आणि दुसऱ्याची ती आगळीक, असाच या लोकांचा एकुणात आव असतो. सर्वधर्मसमभावाच्या नावाने गळे काढणारी ही मंडळी, आपली वेळ आली की मात्र कशातही जात आणि धर्म काढतात. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला, म्हणून ही मंडळी सतत ओरडा करत असतात. मग ‘त्रिवार तलाक’सारखी महिलांच्या सार्वभौम व्यक्तिमत्त्वावर घाला घालणारी प्रथाही शरीयतला मान्य आहे म्हणून महिलांचे हे दमन तसेच सुरू ठेवा, असेही हे म्हणतात.
 
राष्ट्रीय गीत निनादू लागल्यावर त्याला मानवंदना देण्यासाठी उभे राहणे म्हणेच राष्ट्रप्रेम आहे का, असाही सवाल ही मंडळी करतात. अमुक एका ठिकाणी भारताचा तिरंगा लावणे आमच्या धर्माला मान्य नाही म्हणून वेळी रक्त सांडवायला ही मंडळी तयार असतात. ‘अफजल खानाचा वध’ हा पाठ शाळेत शिकविला जात असताना- ‘‘आमचीही मुले त्याच वर्गात बसलेली असतात आणि मग त्यांच्याकडे वर्गातली इतर मुले अफजल खानाचा वंशज म्हणून बघतात, म्हणून शिवाजी महाराजांचे शौर्य शिकवू नका.’ म्हणेपर्यंत या मंडळींची मजल गेलेली आहे! नेमक्या वेळी यांचा धर्म आड येतो. त्यावरचे सर्रास राजकारण ते अत्यंत बीभत्स पद्धतीने करत असतात. ओवैसींची पार्टी कुणाची, कुणासाठी आणि कुठल्या तत्त्वांवर ही पार्टी चालते आणि काय म्हणून ओवैसी मते मागत असतात? हा प्रश्न विचारला की मग मात्र विचारणारा, स्वातंत्र्यावर घाला घालणारा ठरविला जातो. स्वत:साठी सतत धार्मिक स्वातंत्र्याची भाषा केली जाते आणि कशातही धर्म शोधला जातो. तो ‘खतरे मेंङ्क आणत सार्वजनिक जीवन ढवळून काढले जाते. पठाणकोट, उरी आणि आता सुंजवान या लष्करी तळांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. आता ओवैसींनी शहीदांचाही धर्म शोधण्याचे टोक गाठले आहे. सुंजवान हल्ल्यात शहीद झालेले पाचही जवान मुस्लिम होते, असं सांगत शहीदांच्या बलिदानाला त्यांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत तुच्छ असे हे वर्तन आहे. त्याला तातडीने लष्कराकडूनच फटकारले गेले, हे एका अर्थाने बरेच झाले. ‘‘शहीदांचा कोणताही धर्म नसतो. आम्ही बलिदानाला धार्मिक रंग देत नाही. ज्यांना लष्कराची कार्यशैली माहीत नाही, ते लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात,’ अशा शब्दांत कमांडर लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी ओवैसी यांना अनुल्लेखाने फटकारले. ओवैसी सतत धार्मिक गरळच ओकत असतात. त्यांना धर्माचा कावीळ झालेला आहे.
 
‘‘सुंजवानधील हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाच जण कश्मिरी मुसलमान होते. जे लोक मुसलमानांना आजही पाकिस्तानी समजतात, त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे,’ असं ओवैसी म्हणाले होते. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांइतके चांगले आयुष्य मुस्लिम देशांमधल्या नागरिकांनाही नाही, हे सर्वविदित सत्य आहे. ओवैसी पाकिस्तानातले नेते असते, तर त्यांना असे वक्तव्य करताच आले नसते अन् त्यांनी ते केलेच असते, तर केवळ शाब्दिक फटकाऱ्यावरच त्यांचे लष्कर थांबले नसते आणि आतावर ओवैसींच्या नावाने जगाला श्रद्धांजली वाहावी लागली असती! अशी अनेक उदाहरणे आहेत. अब्दुल्ला आणि ओवैसी ज्या उद्दामपणे राष्ट्रविरोधी विधाने अगदी बेदरकारपणे करीत असतात अन् तरीही या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, असा गळाही काढत असतात. पठाणकोट आणि उरीच्या हल्ल्यांनंतर ‘सर्जिकल स्ट्राईकङ्क करण्यात आला आणि आता पाकिस्तान सैरभैर झाला आहे. एकतर जागतिक समुदायाने पाकिस्तानबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ‘‘पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे,’ असे स्पष्टपणे बजावण्यात आले. अमेरिकेने तर त्यांची मदतही तोडली आहे. चीनला दक्षिण आशियात वर्चस्व हवे आहे त्यासाठी ड्रॅगन, पाकिस्तानचा वापर करत आहे. चीन हा काही भरवशाचा पाठीराखा नक्कीच नाही, हे पाकिस्तानलाही माहिती आहे. देशांतर्गत राजकीय अस्थिरता निर्माण झाली की, काश्मीरचा प्रश्न उकरून काढायचा आणि भारतात अतिरेकी हल्ले करायचे, ही पाकिस्तानची कूटनीती आहे. दीडच महिन्यात २३ भारतीय जवान मारले गेले. गेल्या वर्षात पाकिस्तानने ८६० वेळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्या वेळी ओवैसी काहीच बोलले नाही. ‘मुस्लिम दहशतवाद’ असे कुणीही म्हणत नाही. सगळेच मुसलमान काही दहशतवादी नसतात, मात्र दहशतवादी हे मुसलमानच असतात, हेही खरे आहे! उरी असो, पठाणकोट असो की आता सुंजवान असो, दहशतवादी या देशात घुसतात. स्थानिकांच्या मदतीशिवाय ते त्यांच्या कारवायांंना अंतिम रूप देऊ शकत नाहीत, हेही सत्यच आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यांत मारले गेलेले सैनिक आपलेच बांधव होते, हे ओवैसींनी सांगायचेच असेल, तर त्यांच्या धर्मबांधवांना सांगावे जे अतिरेक्यांना मदत करतात. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत मारले गेलेले काही जवान मुसलमान होते, असे सांगणाऱ्या ओवैसींनी हेही सांगून टाकावे की, काही जवान मुसलमान होते हे जितके खरे आहे, तितकेच हेही खरे आहे की, सगळेच दहशतवादी मुसलमान होते आणि सत्यच सांगण्याची उबळ त्यानंतरही कायम राहिली, तर ओवैसींनी हेही सांगून टाकावे की, दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक कोण होते? ‘‘तुम्हाला या देशात परके समजले जाते,’ असा परकेपणा आपल्याच बांधवांमध्ये पेरून ओवैसी आणि त्यांच्यासारखीच मंडळी आपली राजकीय पोळी शेकत असतात. देशात त्यांना जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. मात्र त्यांनी लष्करात हे राजकारण नेऊ नये. या देशाच्या कत्र्यांना मुस्लिम बांधवांवर संशय असता तर त्यांना लष्करात स्थान दिलेच नसते! उच्चपदांवरही मुस्लिम आहेत. अगदी देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदावरही मुस्लिम राहिलेले आहेत.
 
मात्र, आजवर या देशात ज्या काय दहशतवादी कारवाया झाल्या त्यामागे नेमके कोण होते, हेही ओवैसींनी सांगायला हवे.‘‘जम्मू-काश्मीरमध्ये बादामी बाग कॅण्टसह उधमपूरमध्ये धार्मिकस्थळ आहे. माझ्या घरातही एक धार्मिकस्थळ असून तिथे सर्व धर्माची प्रतीकं आहेत,’ असं देवराज अनबू म्हणाले. तरुणांचं दहशतवाद्यांकडे आकर्षित होणं, ही चिंतेची बाब आहे आणि सोशल मीडियामुळेच तरुण दहशतवादाकडे आकर्षित होत असल्याचंही ते म्हणाले. आता सोशल मीडियावर देशविरोधी भावना निर्माण करणारी मोहीम चालविणारे, देशाला पोखरणारे कोण, हेही ओवैसींनीच सांगायला हवे. कुणामुळे सहा राष्ट्रभक्त सैनिकांना बलिदान करावे लागले, हे ओवैसींनीच सांगण्याची गरज आहे...
@@AUTHORINFO_V1@@