मुंबईतील खारफुटी स्वच्छ होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

वनविभाग आणि पालिकेची संयुक्त मोहीम

 
 
 
 
मुंबई, (नितीन जगताप) : मुंबई शहर हे समुद्रात वसलेले आहे. मुंबईला समुद्राचे मोठे जाळे आहे. समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यात खारफुटीचे महत्त्वाचे योगदान आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी स्थानिक नागरिक तसेच पर्यटक कचरा टाकतात. त्यामुळे येथील जीवजंतूच्या जीवाला धोका निर्माण झाला असून खारफुटीही नष्ट होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर वनविभाग आणि मुंबई महानगरपालिका खारफुटीची स्वच्छता मोहीम राबवीत आहे. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होत आहेत.
 
याबाबत नगरसेवक रोहन राठोड म्हणाले कि, समुद्र आणि जमिनीमधील संरक्षण कवचाचे काम खारफुटी करतात. समुद्राच्या लाटा आणि सुनामीचीही तीव्रता त्यामुळे कमी होते. त्यामुळे या खारफुटी वाचल्या पाहिजेत. खारफुटी वाचविण्यासाठी वर्सोवा किनाऱ्यासह मुंबईत स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे.
 
खारफुटीमुळे पाण्याचे शुद्धीकरण करण्यास मदत होते. खारफुटीमध्ये कचरा टाकल्यामुळे मच्छर होतात त्याचा नागरिकांना त्रास होतो. खारफुटी स्वच्छ केल्यास नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. तसेच कचरा साफ केल्यामुळे खारफुटीजवळील जीवसृष्टीही सुरक्षित राहील. त्यामुळे मुंबई महानगर पालिका वनविभागाच्या मदतीने स्वछता मोहीम राबवित आहे.
 
उद्धव चंदनशिवे
सहाय्यक अभियंता, घनकचरा विभाग, के पश्चिम विभाग
 
वांद्रे, वर्सोवा, दहिसर, बोरिवली जेट्टी आदी परिसरात खारफुटी स्वछता मोहीम राबविण्यात येत आहेत. भविष्यासाठी या स्वच्छ राहणे आवश्यक आहेत. पर्यटक आणि स्थानिक रहिवाशी यामध्ये कचरा टाकतात. त्यांनी कचरा टाकू नये तसेच साफसफाई यासाठी पुढाकार घ्यावा.
 
प्रकाश ठाकूर , वनपाल
@@AUTHORINFO_V1@@