पालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेला एलआयसीचे टाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

उद्यानाबाबत एलआयसीची आडमुठी भूमिका

 
  
 
 
 
मुंबई, (नितीन जगताप) : बोरिवली येथे जीवन भीमानगरमधील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेचा ताबा पालिकेला देण्याबाबत १९७० च्या आराखड्यात नोंद असताना एलआयसीने उद्यान विकसित करण्यास आडमुठी भूमिका घेत टाळे ठोकले आहे.
 
बोरिवलीतील जीवन भीमानगरमधील मोठी वस्ती आहे. त्याचा आराखडा १९७० मंजूर झाला त्यावेळी एलआयसीने ११२ एकर मधील १५ टक्के म्हणजे १८ एकर जागा उद्यानासाठी आरक्षित ठेवावी अशी नोंद आहे. एलआयसीने या जागेचा ताबा पालिकेला देऊन उद्यान विकसित करण्यासाठी काही रक्कमही दिली. त्याप्रमाणे पालिकेने तिथे संरक्षण भिंत पाथवेचे काम केले होते. परंतु एलआयसीने आडमुठी भूमिका घेत ती जागा वापरण्यासाठी दिली नाही.
 
 
तत्कालीन महापौर आणि स्थानिक नगरसेविका शुभा राऊळ यांनी या जागेबाबत पालिका आणि एलआयसीकडे पत्रव्यवहार केला. या उद्यानासाठीच्या जागेतील १/३ भाग उद्यान विकसित करण्यात आला. तिथे कर्मउद्योग उद्यान उभारण्यात आले. त्याची पालिका देखभाल करते. परंतु उर्वरित २/३ जागा आहे. त्याला एलआसीने टाळे लावले आहे.
 
नगरसेवक हरीश छेडा निवडून आल्यानंतर त्यांनी पालिकेच्या उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना समजले की, जागेचा २/३ भाग पालिकेच्या ताब्यात आहे परंतु त्याला एलआयसीने टाळे ठोकले आहे. उद्यान नागरिकांसाठी असते परंतु एलआयसीने त्याची अवस्था जंगलारखी केली आहे. पालिकेने हि जागा खुली करावी किंवा रहिवाशांना खुले करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी छेडा यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली. याबाबत पालिका आणि एलआयसीशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी टाळे खोलून देखभालीबाबत उद्यान अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मात्र एलआयसीने सुरक्षा लावून पुन्हा टाळे ठोकले. याबाबत दोन महिन्यापूर्वी पालिकेच्या उद्यान खात्याचे उपायुक्त किशोर क्षीरसागर यांच्यासोबत बैठक झाली त्यांनी ही जागा एका महिन्यात खुली करावी तसेच एलआसीने स्वतः विकसित करावी किंवा पालिकेला विकसित करायला द्यावी. असे आदेश दिले. पालिकेने जागेसाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
 
... अन्यथा तीव्र आंदोलन करणार
 
गेल्या ४० वर्षांपासून ही जागा एलआयसीने ताब्यात ठेवली आहे. पालिकेच्या नवीन विकास आराखड्यातही ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. लोकांना या जागेबाबत उत्सुकता असून एलआसीने लवकरारात लवकर पालिकेच्या ताब्यात दिली पाहीजे. अन्यथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकसह तीव्र आंदोलन करणार.
 
हरीश छेडा, नगरसेवक वार्ड क्र ८
 
एलआयसीच्या कार्यालयीन बाबीसंदर्भात मी काही बोलू शकत नाही त्याबाबत विभागिय व्यवस्थापकांशी संपर्क करावा असे सहाय्यक विभागिय व्यवस्थापक कावेरी सत्पती यांनी सांगितले. विभागिय व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
@@AUTHORINFO_V1@@