भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये इस्रायल दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

 
 
भारतातील प्रमुख राजकीय प्रवक्त्यांना इस्रायलचे निमंत्रण
 
मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये इस्रायल सरकारच्या निमंत्रणानिमित्ताने रविवार दि. १७ फेब्रुवारी ते गुरुवार दि. २३ फेब्रुवारी या कालावधीत इस्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत.
 
 
 
 
 
इस्रायल सरकारच्या परराष्ट्र विभागाने भारतातील विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी निमंत्रित केले आहे. या प्रवासात इस्रायलच्या परराष्ट्र खात्यातील भारत विभागाचे प्रमुख मायकेल रोनेन व डिजिटल डिप्लोमसी विभागप्रमुख शानी वेस भारतातील प्रवक्त्यांशी चर्चा करणार आहेत. जेरुसलेमचे उपमहापौर ओफेर बेरकोविच यांच्यासोबत बैठक, इस्रायलमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांशी व माध्यम विभाग प्रमुखांसोबत गप्पा, तेल अविव विद्यापीठातील सोशल मीडिया कार्यकर्ते इदान बिन्यामिन यांच्यासोबत चर्चा, माजी खासदार डॉ. ऐनाट विल्फ आणि राजकीय कार्यकर्ते टोनेर अविताल यांच्याशी चर्चा, तेल अविवचे उपमहापौर असफ झमीर यांच्यासोबत बैठक तसेच राजकीय पत्रकारांसोबत भोजन समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय प्रवक्त्यांसाठी करण्यात आले आहे. 

या दौऱ्यादरम्यान केशव उपाध्ये यांच्यासमवेत भारतीय प्रवक्ते इस्रायलमधील विकास प्रकल्पांनाही भेटी देणार आहेत. स्टार्ट अप नेशन टूर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट, सिंचन विषयक कारखान्यास भेट इत्यादी विकास प्रकल्पांना भेटी देणे नियोजित आहे...

@@AUTHORINFO_V1@@