सेतुप्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |

 
 
 
 
 
नाशिक : नाशिक सेतू कार्यालयाच्या आवारात आढळून आलेल्या एजंट जयंत पिंपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नाशिकचे प्रभारी प्रांताधिकारी सोपान कासार यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रेशनकार्ड अर्ज स्वीकृती आणि वितरण हे सेतूतच स्थलांतरित करावे. सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, सिडकोतील रेशनकार्ड केंद्रही दाखल्यांच्या अर्ज स्वीकृतीच्याच ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना सेतूच्या अनागोंदीवर नियंत्रणाच्या दृष्टीने दिल्या आहेत.
 
सेतू कार्यालयाच्या कारभारात तक्रारी वाढत होत्या. आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी लागलीच सेतूच्या तपासणीचे आदेश तत्कालीन प्रांताधिकारी अमोल एडगे यांना दिले. त्यांनी दोन-तीनवेळा अचानक भेटी देऊन आढळलेल्या बाबींचा अहवाल तयार केला. या तपासणीच्या अहवालानुसार तपासणीवेळी एजंट पिंपळे याच्याकडे अनधिकृत प्रतिज्ञापत्र तसेच साक्षांकित करतानाही तो आढळून आला होता. कारवाईत त्याच्याकडे प्रतिज्ञापत्र तसेच उत्पन्नाचे दाखलेही सापडले होते. प्रशासनाने ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याचा अहवाल तयारही झाला, पण त्यांची बदली झाल्यानंतर आता लागलीच त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आताचे प्रांताधिकारी कासार यांनी दिले तर पिंपळे याच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे तहसीलदार कार्यालयाकडे सुपूर्द करतानाच ती संबंधित नागरिकांना वाटप करण्याच्या सूचना प्रांताधिकारी कासार यांनी दिल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@