विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी घेतलेल्या पुस्तकांमध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही - विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणताही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. तावडे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री.तावडे यांनी शालेय शिक्षण विभागाने भारतीय विचार साधनाकडून करण्यात आलेली पुस्तक खरेदी, पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकूर याबाबत खुलासा केला.
 
 
 
भारतीय विचार साधनेकडून शालेय शिक्षण विभागाने बाळ-नचिकेत आणि महर्षी अत्री ही पुस्तके खरेदी केली आहेत. भारतीय विचार साधनेमार्फत शालेय शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या पुस्तकात कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही.
 
 
 
चार रंगी छपाई आणि आर्ट पेपरमुळे पुस्तकाची किंमत  ५०  रुपये
 
 
 
भारतीय विचार साधनेकडून खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांची किंमत ५०  रुपये आहे आणि ही किंमत निविदेमध्येच नमूद करण्यात आली होती. ५० रुपये दराने खरेदी करण्यात आलेली पुस्तके ही चाररंगी छपाई, मोठ्या आकारातील आहे तर २०  रुपये दराची पुस्तके ही कृष्ण धवल स्वरुपातील आणि छोट्या आकारातील आहेत. भारतीय विचार साधनेकडून छपाई करुन घेण्यात येणारी पुस्तके ही आर्ट पेपरवर करण्यात येत असून यामध्ये वापरण्यात येणारा कागद, चाररंगी छपाई, वाहतूक खर्च यामध्ये समाविष्ट आहे.
 
 
शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनासाठी शालेय‍ शिक्षण विभागाकडून वेगवेगळी पुस्तके खरेदी केली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा हेतू असतो. विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये संतकथा व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचाही यामध्ये समावेश असून धार्मिक आणि पौराणिक पुस्तकेही घेण्यात आली आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@