रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने तातडीने दुरुस्ती शक्य : चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ’’रस्त्यांसाठी देण्यात येणार्‍या निधीसाठी भरीव तरतूद केल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करणे आणि त्याचा दर्जा उत्तम राखणे शक्य झाले,’’ असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार जे. पी. गावीत, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता एस. एस. पाटील आदी उपस्थित होते.
 
पाटील म्हणाले, ’’खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी एकूण तरतूद २८०० कोटींहून सात हजार कोटी करण्यात आली. रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने करणे शक्य होत आहे. राज्यात ५७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येत आहे. या अभियानात चांगली कामगिरी करणार्‍यांचे कौतुक करण्यासाठी राज्यभरात दौरा केला असून नाशिक शेवटचा जिल्हा आहे. चांगल्या कामासाठी अधिकार्‍यांचे कौतुक करताना त्यांच्या समस्यादेखील जाणून घेण्यात येत आहेत.’’ यावेळी पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणार्‍या पन्नासहून अधिक अधिकार्‍यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
यावेळी हांडे यांनी २०१७ च्या अर्थसंकल्पात ४४ कामे मंजूर असून चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती दिली.
 
चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
 
सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा शासकीय जाहिरात फलकाच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले. सप्तश्रृंगगड येथे फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही मंत्रीमहोदयांनी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@