नेतन्याहू यांच्यावर लागला भ्रष्टाचाराचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |

खटला चालवण्याची पोलिसांची मागणी



तेल अवीव
: आपल्या आक्रमक पवित्र्यासाठी नेहमी जगभरात ओळखले जाणारे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत काही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. तसेच नेतन्याहू यांच्यावर संबंधी खटला भरवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी इस्राइल पोलिसांनी इस्राइलच्या अटॉर्नी जनरल यांच्याकडे केली आहे. परंतु यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नेतन्याहू यांनी हॉलीवुड चित्रपट निर्माता ऑरनॉन मिलकॅन यांच्याकडून लाच घेतल्या आरोप नेतन्याहू यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच काही मोठ्या लोकांकडून देखील काही महागड्या वस्तू स्वीकारल्या असून देशातील एका खासगी वृत्तपत्राचे हिताच्या दृष्टीने देखील त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत व त्यासाठी म्हणून त्यांनी काही लाच घेतल्याचा आरोप देखील नेतन्याहू यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर खटला भरवण्याची मागणी इस्राइल पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतु याला कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया इस्राइलच्या अटॉर्नी जनरलकडून देण्यात आलेले नाही.

दरम्यान नेतन्याहू यांनी या अगोदरच हा आरोप फेटाळून लावला असून आपण कसल्याही प्रकारचा गैरप्रकार केला नाही, असे स्पष्टीकरण नेतन्याहू यांनी दिले आहे. तसेच आपण आपल्या पदाचा राजीनामा देखील देणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पोलिसांच्या या मागणीनंतर मात्र नेतन्याहू यांनी यावर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.
@@AUTHORINFO_V1@@