मनपा आयुक्तांनी केली रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पूलाची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत तसेच गंगापूर एस.टी.पी प्लॅन्टच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आली, खातेप्रमुखांना खात्यासंबंधी विविध कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
 
रामवाडी पूल, गोदा पार्क, गांधी तलाव, अहिल्याबाई होळकर पूल, रामकुंड, दुतोंड्या मारूती परिसर, रामसेतू, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, काझी गढी, संत गाडगेबाबा वसाहत टाळकुटे पूल या सर्व परिसराची पाहणी करून या भागातील विविध समस्या जाणून घेतल्या गंगा प्रदूषण, आरोग्य, भुयारी गटार, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रकल्पाची तसेच मनपा प्रकल्पांची बाबतची माहिती जाणून घेऊन तेथील समस्या सोडवण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले. या पाहणी दौर्‍यात स्मार्ट सिटी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत सर्व माहिती जाणून घेतली त्याबाबतचे नकाशे तसेच त्या भागाच्या प्रत्यक्ष पाहणी यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत साकारले जाणारे प्रकल्प लवकरात लवकर साकारण्याच्या दृष्टीने गती देण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.
 
गंगापूर गावातील एस.टी.पी. प्लँटची पाहणी आयुक्त यांनी केली या वेळी सुरू असलेल्या कामाबाबतची माहिती जाणून घेऊन त्याबाबत कामाला गती देऊन तो एसटीपी प्लँट लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत आदेशित करण्यात आले.
 
या पाहणी दौर्‍यात अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता संजय घुगे, एस. एम. चव्हाणके, उदय धर्माधिकारी, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, विभागीय अधिकारी नितीन नेर, बी. वाय. शिंगाडे, निर्मला गायकवाड सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे स्मार्ट सिटीचे विभागाचे अधिकारी तसेच मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@