शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक बाबींसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीतून जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांसोबतच पिण्याचे शुद्ध पाणी नागरीकांना मिळण्यासाठी हा निधी प्राधान्याने खर्च करावा, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षीक नियोजनाबाबत विभागीय बैठक घेण्यात आली. 
 
 
राज्यात कर्जमुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोठा निधी द्यावा लागला आहे, तरीही जिल्हा नियोजनाच्या निधीत कुठलीही कपात करण्यात येणार नाही. संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी हा निधी देण्यात येत असला तरीही लोकप्रतिनिधींनी प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे. स्थानिक गरजा विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र निधी मर्यादीत असल्यामुळे प्राधान्य क्षेत्र ठरविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्राप्त निधी त्याच्या उद्दीष्टांसाठी वेळेत खर्च होईल, याकडेही लक्ष द्यावे. जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदांना देण्यात येणारा चांगल्या पद्धतीने खर्च करावा असे त्यांनी यावेळी संगितले. 
 
 
 
 
जिल्हा नियोजनचा निधी नागरीकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी खर्च करण्यात यावा. रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा. प्रामुख्याने कृषि क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून उत्पादन वाढ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग आणि त्याचे मार्केटींग या बाबी लक्षात घेऊन त्यासाठी उपक्रम राबवावेत. मर्यादीत संसाधनाचा उपयोग योग्य नियोजनातून करून स्थानिक विकासाला गती देण्यासाठी इको-सिस्टीम तयार करावी, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. 
 
@@AUTHORINFO_V1@@