दीपा करमाकरची कामगिरी उत्तम नसल्याने ती कॉमनवेल्थमध्ये खेळणार नाही : प्रशिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |

भारताची प्रसिद्ध जिमनॅस्ट दीपा करमाकरची कामगिरी उत्तम नसल्याने तसेच तिला आणखी मेहनतीची आवश्यकता असल्याने ती कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळणार नाही. अशी माहिती दीपा करमाकर हीचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी दिली. आणखी मेहनत करुन ती 'एशियन गेम्स' या स्पर्धेत उतरेल असेही त्यांनी सांगितले.
 
येत्या काळात होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारतातर्फे जिमनॅस्टिक्समध्ये दीपा करमाकरला बघण्याची सगळ्यांनाच उत्सपकता होती. तिच्या खेळामुळे प्रभावित होवून भारतात जिमनॅस्टिक्स या खेळ प्रकाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, मात्र प्रशिक्षकांनी तिला परवानगी न दिल्याने ती आता कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भाग घेवू शकणार नाही. "एक प्रशिक्षक म्हणून मी तिला कॉमनवेल्थसाठी पाठवण्याची परवानगी देत नाही, तिला आणखी मेहनतीची आवश्यकता आहे." अशा शब्दात नंदी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच एक प्रशिक्षक म्हणून त्यांचे कौतुक देखील करण्यात येत आहे.
 
रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपा करमाकरच्या उत्तम प्रदर्शनाचे कौतुक करण्यात आले होते. तसेच तिच्यामुळे भारताला जिमनॅस्टिक खेळप्रकारात ओळख देखील मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील तिचे भरपूर कौतुक केले होते. एशियन खेळांमध्ये तिच्याकडून उत्तम प्रदर्शनाच्या अपेक्षा आहेत.
@@AUTHORINFO_V1@@