आजच्या सामन्यात हिटमॅनची शतकी खेळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
पोर्ट एलिझाबेथ : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा एकदिवसीय सामना सेंट जॉर्ज पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला चांगलेच नमवले आहे. या सामन्यात रोहित शर्माने ११५ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात रोहित शर्माने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे.
 
 
 
आजच्या सामन्यात मैदानावर प्रथम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या जोडीने सुरुवात केली. शिखर धवन ३४ धावांवर बाद झाला मात्र रोहित शर्माने आपल्या आक्रमक खेळाने भारताला ११५ धावा करून दिल्या. रोहित शर्मा याच्या कारकिर्दीतील हे १७ वे शतक आहे. रोहितने आज १२६ चेंडूत ११५ धावा काढल्या आहेत.
 
 
 
भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेपुढे २७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आजचा सामना कोण जिंकत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण आजचा सामना भारतने जिंकला तर भारत ही मालिकाच जिंकेल त्यामुळे दक्षिण आफ्रिकेपुढे ‘करो या मरो’ अशी परिस्थिती आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@