मनोरूग्णांचे सर्वेक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018   
Total Views |
 

 
 
ऐसे तडपू के जैसे
जलबिन मछली..
 
 
सिनेमातली नायिका गाण्याचे हे बोल बोलताना आत्यंतिक दु:खाने, वियोगाने तडपत असते. ही तडफड, तो वियोग महाराष्ट्रातल्या तमाम विपक्षी नेत्यांच्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यात इतका भरून राहिला आहे की, त्या सगळ्यांनी तोंड उघडले की वाटते, झाले. आता सद्यस्थितीचे सरकार किती वाईट, सरकारचे नेतृत्व किती बेकार याविषयी तेच ते दळण ऐकावेच लागणार. काही नवीन तरी बोला. पण छे! सर्जनशीलता आणि सृजनशीलता असती तर हे सारेजण आज, ‘गेले ते दिन गेले‘ म्हणत विलाप करताना विद्यमान सरकारच्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाबाबत बोंब मारताना दिसले नसते. निष्क्रिय बोंब मारताना मुद्दे पण तेच तेच.
 
कोणी स्वयंघोषित जाणता राजा आजकाल कोणत्याही सभेत मग ती सभा कोणत्याही विषयाची असू दे, एकच पालुपद चालवताना दिसतो. ते पालुपद असते घटनेवरचा प्रहार, घटनेवरचे राजकारण खपवून घेणार नाही वगैरे वगैरे... हे बोलत असताना आपण राज्यघटनेचे मोठे आणि एकमेव पाईक आहोत, असे भासवायला मात्र ते विसरत नाहीत तर दुसरीकडे जनतेने ज्यांना ‘साथ द्या साथ द्या’च्या रंजक कोड्यात अडकवले ते नाशिक महानगरपालिकेचे औटघटकेचे राजे. त्यांनाही नवीन शोध लागला आहे की, देशात आणीबाणीसादृश्य परिस्थिती आहे. ते म्हणतात, ‘‘इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, त्यावेळी साहित्यिक संपादक मंडळींनी आवाज उठवला. मग आता देशाच्या आणीबाणीसदृश्य परिस्थितीवर का कोणी आवाज उठवत नाही?’’ आता यावर काय बोलावे? विपक्षी नेते जरी सत्तेच्या वियोगात भांबावून काहीही बोलत असले तरी लोकांची डोकी तर ठिकाणावर आहेत.
खरे खोटे लोकांना कळते हो.
 
 
‘‘जातीपातीचं राजकारण,
प्रांतभेदाचं गणित कमी का मांडलं..
पण सत्तेचं चिन्ह नाही!
नमो आणि कमळ ध्यानीमनी
अगदी स्वप्नातूनही जात नाही!
 
 
या भीषण अवस्थेत विपक्षी सध्या रडून कुथून जगत आहेत. असो. नवीन सर्वेक्षणात जाहीर झाले म्हणे की, महाराष्ट्रात ५८ हजार मनोरुग्ण आहेत पण सत्तेशिवाय २४ तास अहोरात्र थयथयाट करणार्‍या विपक्षींची मनस्थिती पाहून वाटते सर्वेक्षणातला रुग्णांचा आकडा कमी लिहिला आहे की काय??
 
 
सावधान! मनोरुग्ण वाढत आहेत
 
 
समाजमन आज इतके सैरभैर आहे की त्यामुळे समाजभान विस्कळीत झाले आहे. या विस्कळीत समाजभानात होणार्‍या आत्महत्या समाविष्टच आहेत. खोलात गेले तर जाणवते की परिस्थितीमुळे काही लोक आत्महत्या करतात, पण त्या परिस्थितीवर मात करणारे मजबूत सक्षम आरोग्यदायी मन संबंधितांकडे असते तर कदाचित चित्र वेगळे असते. आत्महत्येकडे वळणारा माणूस मनाने आजारीच असतो. समस्या नसलेल्या, त्रास नसलेल्या सुखी माणसाचा सदरा कुणाकडे आहे का? नाहीच, मग कोणत्याही समस्येचे निराकरण आत्महत्या कसे होऊ शकते? वेळीच मनाला आधार, धीर मिळेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. मन, मनाचे आरोग्य राखणे गरजेचे आहे.
 
 
दुसरीकडे मनावरचा ताबा सुटल्याने दुसर्‍यांना प्रताडित करण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही घटनांकडे पाहूया. पवईत दोन जिवलग मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले. एका मित्राने दुसर्‍याकडे फक्त दहा रुपये मागितले. त्या मागण्याचे पर्यवसान मारामारी भांडणात होऊन दोन जिवलग मित्रांपैकी एक मित्र मारामारीत मरण पावला. कुठे वेटरने ऑर्डर आणायला उशीर केला म्हणून त्यावर गोळी झाडली गेली तर कुठे चिमुकल्या निष्पाप बालिकेवर अत्याचार होताहेत. मुंबई शहरातीलच गोष्ट. माणूस राहत्या घरी मेला. फ्लॅटचा दरवाजा बंद. मृतदेह कुजल्यावर वास येऊ लागला. तेव्हा कुठे कळले की माणूस मेला आहे. तो काही बेवारस, अनाथ नव्हता. लोकार्थाने त्याला सुशिक्षित, आर्थिक सुबत्ता असलेली दोन मुले होती. दोघेही विदेशात राहत होती.
 
 
पण स्वतःच्या जगण्यात सारेच इतके मश्गुल की दहा वर्षांपासून दोन्ही मुलांचा पित्याशी संपर्कच नव्हता. आता काही चिठ्ठी तारेचा जमाना नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या जाळाचे जग आहे. पण या जाळ्यात नात्यांचे सूर जुळले नाहीतच. भरीस भर या माणसाच्या पत्नीने त्याला तीन वर्षांपूर्वी म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळीच घटस्फोट दिला होता. मृत माणसावर त्याच्या मुस्लीम पद्धतीने अंतिम संस्कार व्हावे यासाठी घटस्फोटित पत्नीला कळवले गेले. यावर पत्नीचे शब्द ’’माझा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी अंत्यसंस्कार करणार नाही.’’
 
का? का? माणसाची माणुसकी कुठे गेली आहे? दया, करुणा या मानवी मूल्यांची वानवा का आहे? आपसातले प्रेम, माया, वात्सल्य कुठे हरवले आहे? या सर्वांच्या नसण्यातूनच मन आजारी पडत आहे. सावधान! मनोरुग्ण वाढत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@