जिल्‍हयातील तरूणांसाठी मोठया प्रमाणावर रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करणे हेच आपले ध्‍येय – सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
बल्‍लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन संपन्‍न
 
 
चंद्रपूर : जिल्‍हयातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्‍ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्‍यादृष्‍टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्‍लारपूरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन दर महिन्‍याला २०  हजारावर रोजगार देण्‍याचा व तीन वर्षात ३  हजार तरूण त्‍या माध्‍यमातुन प्रशिक्षीत करण्‍याचा आमचा मानस आहे. प्रतीवर्ष १  हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातुन बाहेर पडतील. या आधीही पोंभुर्णा आणि आगरझरी या ठिकाणी अगरबत्‍ती प्रकल्‍प आम्‍ही सुरू केला आहे. तैवान सरकारच्‍या सहकार्याने टूथपीक निर्मीतीचा कारखाना तयार करण्‍यासाठी करार करण्‍यात आला आहे. या जिल्‍हयात तरूणांसाठी रोजगाराच्‍या मोठया प्रमाणावर संधी उपलब्‍ध करून देत या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणे हेच आपले ध्‍येय असल्‍याचे प्रतीपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
 
 
बल्‍लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्‍या उदघाटन समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, तरूणांसाठी आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍या अभियानाला सुरूवात आम्‍ही या जिल्‍हयात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्‍दा केले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२००  एकर जागा उपलब्‍ध झाली आहे. बल्‍लारपूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुध्‍दा सुरू होणार आहे. हिंगणघाट चे यांच्‍या मदतीने बल्‍लारपूर येथे कापड निर्मीती केंद्र सुध्‍दा सुरू होणार असल्‍याची माहिती यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@