महापौर चषक जिम्नॅस्टिक स्पर्धेचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : नाशिक महानगरपालिका ’महापौर चषक जिम्नॅस्टिक २०१८ ’ स्पर्धांचे उद्घाटन आ. बाळासाहेब सानप यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी होत्या.
 
कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, गजानन शेलार, सलीम शेख, दीक्षा लोंढे, विधी समिती सभापती शीतल माळोदे, शहर सुधार समिती सभापती भगवान दोंदे, सुमन सातभाई, शशिकांत जाधव, अलका अहिरे, वत्सला खैरे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, मुकेश शहाणे, मुशीर सय्यद, नगरसेवक गुरमित बग्गा, दिनकर आढाव, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, प्रशांत जाधव, अजिंक्य साने, विमल पाटील, प्रियांका घाटे, प्रशांत मोरे, मविप्रचे पदाधिकारी सचिन पिंगळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर.एम. बहिरम, आर. आर. गोसावी, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, शहर अभियंता उत्तम पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी यशवंत ओगले, महेंद्र पगारे आदींसह नगरसेवक पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केले. काँग्रेस गटनेता तथा अध्यक्ष नाशिक जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे शाहू खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार नगरसेवक उद्धव निमसे यांनी मानले. या कार्यक्रमात जिम्नॅस्टिकच्या विविध प्रकाराचे सादरीकरण खेळाडूंनी केले. कीर्ती भवाळकर यांच्या ग्रुपने भरतनाट्यम् सादर केले. स्वानंदी वालझाडे हिने योगाची प्रात्यक्षिके सादर केली
 
@@AUTHORINFO_V1@@