सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारत सुस्थितीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018
Total Views |
 
धवन-कोहलीची अर्धशतकीय भागीदारी, 
१ बाद ७९ धावा
 
 
 
जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज चौथा एकदिवसीय सामना होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असली तरी शिखर धवन व कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. चौथे षटक चालू असतानाच सलामीवीर रोहित शर्मा रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, त्याने अवघ्या ५ धावा केल्या. त्यांनतर शिखरने (४२ चेंडूत ४३ धावा) आक्रमक तर विराटने (३६ चेंडूत २५ धावा) संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. आत्ता १५ षटकांमध्ये भारताने १ गड्याच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या आहेत.
 
 

तत्पूर्वी एकदिवसीय मालिकेत सलग चौथ्यांदा विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रकाश झोतात धावांचा पाठलाग करणे कठिण ठरेल. पहिल्या तीन सामन्यांमध्ये ज्या उत्फुर्ततेने खेळ केला तसाच चौथ्या सामन्यात खेळ करावा लागेल. या सामन्यात केदार जाधवला दुखापतीमुळे वगळण्यात आले असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. विजयाचा अश्वमेध सुसाट निघाला असताना आज खेळल्या जाणा-या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवून ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाला चालून आली आहे. दुसरीकडे यजमान द. आफ्रिकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान असेल. दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने आजचा सामना करो या मरो अवस्थेतला आहे. एबी डीव्हिलीयर्सचं संघातलं पुनरागमन हा आफ्रिकेसाठी एकमेव सकारात्मक मुद्दा ठरणार आहे. शिखर धवन हा १०० वा एकदिवसीय सामना खेळत आहे.
 
गुलाबी एकदिवसीय सामना 
स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा एकदिवसीय सामना खेळविला जाईल. अशा प्रकारच्या सामन्याचे पहिल्यांदा आयोजन २०११ मध्ये झाले होते. या सामन्यासाठी द. आफ्रिका संघ गुलाबी जर्सी परिधान करुन खेळतात. विशेष म्हणजे या गुलाबी जर्सीमध्ये खेळताना त्यांनी एकही सामना गमावलेला नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@