आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक विजेतेपदावर भारताची नजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जोहान्सबर्ग : आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आज भारताची नजर ऐतिहासिक विजेतेपदावर असणार आहे. याआधीच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने कौतुकास्पद विजय मिळविला आहे. आजचा सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वांडरर्स मैदानावर खेळला जाणार असून आजच्या सामन्यात जर भारताने विजय मिळविला तर ही मालिका भारत दिमाखाने आपल्या खिशात घालून घेणार आहे.
 
 
 
 
 
दक्षिण आफ्रिकेला नमवून ही मालिका आपल्या नावावर करून घेण्याची आज भारताकडे मोठी संधी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांच्या नजर लागणार आहे. 
 
 
 
भारताने या मालिकेतील तिसरा सामना १२४ धावांनी जिंकून या मालिकेमध्ये भारताने आफ्रिकेविरोधात ३-० अशी आघाडी घेतली होती. भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद दीड शतकी खेळीच्या बळावर भारताने अफिकेला दिलेले ३०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, आफ्रिका संघ १७९ धावांवरच कोलमडून पडला होता. या एकदिवसीय मालिकेत भारताने उत्तम कामगिरी करत तीन सामने आपल्या नावावर करून घेतले आहे.
 
 
 
विराट कोहली आणि त्याची विराट सेना आजचा सामना खेळायला पूर्णपणे सज्ज झाली असून भारत आज ऐतिहासिक विजयावर आपले नाव कोरतो काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील सामन्यांमध्ये विराट कोहली आणि शिखर धवन यांनी खेळाचे उत्तम प्रदर्शन केले होते. काही तासांत आजच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@