त्र्यंबक नगरपरिषदेची विशेष सर्व समिती निवडणूक बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : त्र्यंबक नगरपरिषदेची आज विशेष सर्व समिती निवडणूक बिनविरोध पार पडली. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये विशेष समिती निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते.
 
येथील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस सुरुवात झाली. भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने फक्त औपचारिकता शिल्लक राहिली होती. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी पदभार स्वीकारला.
 
 
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती उपनगराध्यक्ष पप्पू शेलार, आरोग्य रक्षण वैद्यकीय यात्रा जत्रा समिती सभापती विष्णु दोबाडे, सदस्य सागर उजे, कैलास चोथे, माधवी भुजंग, मंगला आराधी, पाणीपुरवठा समिती सभापती शिल्पा रामायणे, बांधकाम समिती सभापती दीपक गिते आणि महिला व बालकल्याण समिती सभापती भारती बदादे आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@