भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
डर्बन: दक्षिण आफ्रीकेसोबत खेळल्या गेलेली कसोटी मालिका गमावल्यानंतर आता आजपासून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. आज डर्बन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे मैदानावर प्रथम डे कॉक आणि हाशीम अमला फलंदाजीसाठी उतरले आहेत.
 
 
 
 
पहिला कसोटी सामना हातातून गेला असल्याने या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. आजचा सामना भारतासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. २-१ अशा फरकाने भारताने कसोटी मालिका हातातून गमावली होती. त्यामुळे आता भारताला एकदिवसीय सामन्यात उत्तम खेळाचे प्रदर्शन करणे अनिवार्य आहे.
 
 
 
एकूण सहा एकदिवसीय सामने भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे. स्वदेशी मैदान नसल्याने आणि अनुभवी खेळाडू असल्याने भारताला हे सामने खेळणे जरा कठीण जाणार आहे असे म्हटले जात आहे. मात्र आजच्या सामन्यात काय होतं हे पाहणे आज जास्त महत्वाचे ठरणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका ६५ धावा आणि १ बाद अशा स्थितीत खेळत आहे. हाशीम आमला याला केवळ १६ धावांवर बाद करण्यात आले आहे. 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@