भाजपतर्फे नेत्रतपासणी शिबिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडी आणि सन्मती आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मखमलाबाद नाका येथे आयोजित तीन दिवसांच्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह एकूण ८५० लोकांनी नेत्रतपासणी करून घेतली.
 
सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून हा उपक्रम भाजप वैद्यकीय आघाडीच्या माध्यमाने घेण्यात आला, असे हॉस्पिटलच्या संचालिका सोनल दगडे आणि डॉ. मनोज दगडे यांनी सांगितले. आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, चिटणीस लक्ष्मण सावजी, सभागृह नेते दिनकर पाटील, रोहिणी नायडू, डॉ. प्रशांत पाटील, हिमगौरी आडके, स्वाती भामरे, अनिल भालेराव आदींनी शिबिरास भेट दिली.
 
डॉ. मनोज दगडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. ज्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला त्यांच्यावर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरीव सवलत असेल, असे सोनल दगडे यांनी सांगितले. प्रास्ताविक भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत नामपूरकर यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@