अर्थसंकल्प २०१८ : काय स्वस्त, काय महाग?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचा विचार केला तर यावर्षीच्या अर्थसंकल्पानंतर काय महाग झाले आणि काय स्वस्त झाले हाच प्रश्न प्रथम सामान्य जनतेला पडत असतो. त्यामुळे २०१८ च्या अर्थसंकल्पानंतर देखील काय महाग झाले आणि काय स्वस्त झाले असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य जनतेला आहे.
 
जाणून घ्या यावेळच्या अर्थसंकल्पाने जनतेला दिलासा दिला आहे की जनतेची दिशाभूल केली आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष होते कारण १ जुलै २०१७ला वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाला आणि यामुळे वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ व घट झाली. त्यामुळे आता या अर्थसंकल्पाने नेमके जनतेला काय दिले हे जाणून घेणे जनतेसाठी महत्वाचे ठरणार आहे.
 

ट्रक आणि बसचे टायर महाग

मुलांची खेळणी आणि खेळ महाग

सौंदर्य प्रसाधने, मेकअप कीट, त्वचेची निगा राखणाऱ्या वस्तू महाग

काजूवरील सीमा शुल्क कमी केल्याने काजू स्वस्त होणार

कार, दुचाकी (बाईक), रेशीम, चप्पल महाग

चकाकी दिलेले रत्न महाग

रूम फ्रेशनर, शौचालय संबधी वस्तू महाग 
पेट्रोल आणि डीझेल स्वस्त 

तंबाखू आणि अमलीपदार्थ महाग 
 
 
@@AUTHORINFO_V1@@