किरकोळ वाद वगळता शेंदुर्णी नगरपंचयातीचे मतदान शाततेत57 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |
 
 
किरकोळ वाद वगळता शेंदुर्णी नगरपंचयातीचे मतदान शाततेत
57 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद 
शेंदुर्णी, ता. जामनेर, 9 डिसेंबर
 
जामनेर तालुक्यतील पहिली नगरपंचायत शेंदुर्णीच्या पहिल्या नगरपंचायतीसाठी 9 रोजी मतदान किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडले. या निवडणुकिसाठी बाहेरगावी असलेल्या मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. नगराध्यक्षपदासाठीच्या 4 आणि 17 प्रभागांसाठीच्या 53 उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी मतपेटीत बंद झाले असून आज सोमवार रोजी सकाळी 7.30 वाजेपासून मतमोजणी केली जाणार असून दुपारी 12 वाजे पर्यंंत निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.या निवडणुकित 17 हजार 897 मतदार होते यापैकी 13 हजार 304 यांनी मतदानाच हक्क बजावला असून 74.33 टक्के मतदान झाले .
 
 
प्रतिष्ठेची निवडणुक
शेंदुर्णी ग्रामपंचयात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली आहे. परंतु गेल्या पंचवार्षीक निवडणुकित भा.ज.पा.ने येथे विजयश्री घेचून आणली. शेंदुर्णीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड हेच बहुसंख्यवेळेस वजनदार नेतृत्व सिध्द झाले. परंतु राज्यात जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकिने इतिहास घडविला नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या.यामुळे शेंदुर्णी नगरपंचायतीची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भा.ज.पा.साठी प्रतिष्ठेची ठरली आहे. असे असले तरी मनसे आणि शिवसेना या पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवुन आपली ताकद आजमवून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुक प्रतिष्ठेची असल्याने सर्वच पक्षांनी अधिकाधिक मतदान कसे करुन घेता येईल याकडे लक्ष दिले.
दुपार पर्यंत मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. दुपार नंतर मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसला. वृध्द मतदारांना तरुण मतदान केंद्रावर घेवून येत असल्याचे चित्र होते. मतदानादरम्यान कोणताही गोंधळ होवू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त , स्ट्राईकिंग फोर्सचा चोखबंदोबस्त होता.
 
बाहेरगावाहूनही आले मतदार
नगरपंचायतीच्या निवडण्ुकित मतदानासाठी पुणे, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद व मध्यप्रदेश येथे रोजगारासाठी गेलेले मतदार शेंदुर्णीत येवून आपला मतदानाचा हक्क बजावला.
 
 
आज होणार मतमोजणी
लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी आज सोमवारी सकाळी 10.30 वाजेपासून माहेश्वरी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. 5 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व सहाय्यक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
 
 
प्रभाग निहाय झालेले मतदान
प्रभाग क्र.1 - 1 हजार 230 मतदारांपैकी 990 यांनी मतदानाचा हक्क बजावला, प्रभाग 2- 939 पैकी 673 , प्रभाग 3- 1 हजार 113 पैकी 874 , प्रभाग 4- 898 पैकी 592 , प्रभाग 5 - 1 हजार 130 पैकी 869 , प्रभाग 6- 993 पैकी 771 , प्रभाग 7 – 789 पैक 605 , प्रभाग 8 – 1 हजार 375 पैकी 994 , प्रभाग 9- 1 हजार 50 पैकी 823 , प्रभाग 10 – 850 पैकी 651 , प्रभाग 11 - 1 हजार 228 पैकी 883 , प्रभाग 12 – 1 हजार 30 पैकी 773 , प्रभाग 13 – 1 हजार 45 पैकी 724 , प्रभाग 14 – 1 हजार 577 पैकी 1078 , प्रभाग 15 - 865 पैकी 626 , प्रभाग 16 – 914 पैकी 706 आणि प्रभाग 17 – 872 पैकी 672 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे 17 हजार 897 मतदारांपैकी 13 हजार 304 मतदारांनी मतदान केले असून 74.33 टक्के मतदान झाले.
सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. 1 मध्ये 80.04 टक्के तर सर्वात कमी प्रभाग क्र. 4 मध्ये 65.99 टक्के मतदान झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@