बजरंगदलाचे राष्ट्रीय संयोजक सोलंकी आज अमळनेरात'हुंकार 'सभेला संबोधित करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |
 
बजरंगदलाचे राष्ट्रीय संयोजक सोलंकी आज अमळनेरात
'हुंकार ' सभेला संबोधित करणार
जळगाव, 9 डिसेंबर
बजरंगदलाचे राष्ट्रीय संयोजक सोहनजी सोलंकी हे आज 10 रोजी अमळनेर येथे येत असून ,प्रताप मिल कंपाउंड परिसरात सायंकाळी 4 वा. ' हुंकार ' सभेला ते संबोधीत करणार आहेत.
 
सोहनजी सोलंकी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असून त्यांनी अनेक जबाबदा-या पार पाडल्या आहेत. संसदेत कायदा करुन आयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधावे या मागणीसाठी देशातील 543 लोकसभा मतदारक्षेत्रात हुंकार सभा आयोजित केल्या जात आहेत. जळगाव लोकसभा मतदारक्षेत्रासाठीची सभा आज 10 रोजी सायंकाळी 4 वा. होणार आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने 29 ऑक्टोबर रोजी श्रीराम जन्मभूमीबाबत केलेल्या विधानात हा विषय आमच्या प्राथमिकतेचा नाही असे सांगीतले. त्यामुळे हिंदू समाजाची अस्मिता दुखावली गेली आहे .हा हिंदू समाजाचा अपमान आहे . अयोध्याचा विषय न्यायालयात अनिश्चीत काळात राहु देणे योग्य नाही. संसदेत कायदा करुन श्रीराम मंदिर करावे या मागणीसाठी ही सभा होणार आहे. यासभेला मंचावर महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज , फैजपूर, महामंडलेश्वर पं.पू. हंसानंद तीर्थ महाराज कपिलेश्वर,प.पू.संत ईश्वरदासजी महाराज नांदगाव आदींसह धर्माचार्य,किर्तनकार, प्रवचनकार उपस्थित राहणार आहेत. या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन विश्वहिंदू परिषद व बजरंग दल ने केले आहे .
 
@@AUTHORINFO_V1@@