आठवले यांना धक्काबुकी ; उल्हासनगर बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



उल्हासनगर : पूर्वाश्रमीचा रिपाई पक्षात युवक आघाडीत कार्यरत असलेला प्रविण गोसावी याने शनिवारी रात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले असून उल्हासनगरात रिपाईचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून याचा निषेध केला. तर उल्हासनगरात शांतता पूर्ण बंद पाळण्यात आला.

 

पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप यांनी रिपाई प्रदेश सचिव नाना पवार, जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्यासोबत बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. यावेळी शोभा जाधव, रामेश्वर गवई, शमशाद अली उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे यांनी फर्स्ट गेट आनंद नगर येथे कार्यकर्त्यांसोबत बंदचे आवाहन केले. आठवले यांना धक्काबुकी करणाऱ्या प्रविण गोसावी याला जमावाने बेदम मारहाण केल्याने रात्री उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने गोसावीला जेजे मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

दरम्यान, रामदास आठवले यांना धक्काबुकी करताना पोलिसांनाही धक्का देणाऱ्या प्रविण गोसावी याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद पोलीस नाईक पंढरी चव्हाण यांनी नोंदवली आहे. रात्रभर व दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे,सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@