करबुडव्या विजय मल्ल्याला आणणार भारतात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक पैसे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याचे इंग्लंडकडून भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकते. यासंदर्भात लंडन न्यायालय सोमवारी त्याच्या प्रत्यर्पणावर निर्णय देण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालय निकाल देणार आहे. यासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे.

 

सीबीआयचे संयुक्त संचालक ए साई मनोहर यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. भारताने विजय मल्ल्यावर कारवाई करण्यासाठी इंग्लंडमधील तपास यंत्रणेकडेही साहाय्य मागितले होते. त्यानुसार युकेमधील न्यायालयाने त्याला कर्ज बुडवल्याप्रकरणी ८८ हजार पाँड्सचा दंड ठोठावला होता. याबरोबरच त्याच्या लंडनमधील मालमत्तेवरही जप्ती आणण्यात आली होती.

 

सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असे घोषित केले होते. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळे 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असे त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली आहे. विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@