सोशल मीडियावर रंगतेय राज्य नाट्य स्पर्धेच्या "एक्झिट पोल" ची चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |


 
जळगाव :  
सध्या देशभरात तसेच खानदेशात देखील निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकांचे एक्झिट पोल देखील जाहीर व्हायला लागले आहेत. या निवडणुकांचा फिव्हर जळगाव येथील नाट्य क्षेत्रावर देखील जाणवू लागला आहे.
 
नुकत्याच संपलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील नाटकांचे सादरीकरण झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या निकालाचे देखील एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या बाबत शहरातील नाट्य कर्मिंमध्ये व्हॉट्स ऍप वर चर्चा रंगू लागली आहे.

 
 
कोण असेल विजेता
 
राज्य नाट्य स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या हौशी नाट्य संस्थांची संख्या वाढत असल्याने निकालाची देखील उत्सुकता वाढत असते. त्यात सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ग्रूप तयार होत असतात
 
नाट्य कर्मिनी देखील असे चार ते पाच व्हॉट्स ऍप ग्रूप बनविले असून यावर आता नाट्य स्पर्धेचा एक्झिट पोल जो तो मांडू लागला आहे. कोणते नाटक असेल विजेते आणि कोणाला मिळणार नारळ या चर्चेने सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे.
 
तरुण कलावंताचा वाढता सहभाग आशादायी
 
शहरातील नाट्य चळवळ सुरू रहावी यासाठी अनेक रंगकर्मींनी अतोनात प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश मिळत असल्याचे दिसू लागले आहे. तरुण व नवख्या हौशी कलावंताची संख्या वाढत असल्याने ही नाट्य क्षेत्रासाठी आशादायी चित्र आहे.
@@AUTHORINFO_V1@@