रायसोनीत एनर्जी ईफिशीयंट वर्कशॉप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील विभागाच्यावतीने 6 ते 8 डिसेंबरदरम्यान एनर्जी ईफिशीयंट बिल्डिंग या शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पर्यावरण पूरक इमारतींचे बांधकाम करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे बांधकाम नियोजन करताना वापरण्यात येणारी साहित्य सामग्री पर्यावरण पूरक कशी राहील,
 
घरातील येणारा प्रकाश आणि हवा याचे नियोजन, उर्जा आणि पाणी यांचा संयोजित वापर कसा करता येईल, याबाबत आणि ग्रीन बिल्डिंग मानांकन पद्धत आणि मार्गदर्शक तत्वे आदि विषयीची माहिती प्रशिक्षक मनीषा शेट्टी व जयेश वीरा यांनी दिली.
 
पारंपारिक उर्जा स्त्रोतांची बचत होईल, पर्यावरणाची हानी होणार नाही तसेच पर्यावरण पूरक इमारतीचे बांधकाम करण्यास भर देण्यात यावा, असे मत प्राचार्य डॉ. ए.जी. मॅथ्यु यांनी व्यक्त केले.
 
उर्जेचा वाढता वापर आणि पर्यावरणाचा पारंपारिक स्रोताचा विचार करता बांधकाम पर्यावरणपूरक करावे, असे विभागप्रमुख प्रा.राकेश तिवारी यांनी सांगितले.
 
हैद्राबाद येथील इंडियन ग्रीन बिल्डिंग परिषद व सिव्हील विभागाच्यावतीने ही तीन दिवसाची कार्यशाळा होत आहे. संयोजक विभागप्रमुख प्रा.राकेश तिवारी व समन्वयक प्रा.शंतनू पवार आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रा.सौरभ नाईक यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@