पं.दीनदयाळ उपाध्याय अध्यासन स्थापण्यासविद्यापीठ अनुदान आयोगाची मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

1.25 कोटी रुपयांचे अनुदान मान्य



 
 
जळगाव : 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन स्थापन करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिली असून त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचे अनुदान मान्य केले आहे.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील शैक्षणिक संस्थांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनासाठी प्रस्ताव मागविले होते. सादर झालेल्या प्रस्तावातून 18 संस्थांना सादरीकरणासाठी बोलविण्यात आले होते.
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून या प्रस्तावाचे सादरीकरण प्रा.मनिष जोशी यांनी केले होते.
चौघांमध्ये जळगाव भारतातून केवळ चार शैक्षणिक संस्थांना हे अध्यासन मंजूर झाले असून,
 
त्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ, जम्मू काश्मीर विद्यापीठ व अलगप्पा विद्यापीठ, तामिळनाडू यांचा समावेश आहे.
 
छाननी समितीने सादरीकरणात प्रस्तावातील उपक्रम, उद्दिष्टांची गुणवत्ता, विद्यापीठाची संशोधन प्रगती, नॅक मूल्यांकनातील श्रेणी, सामाजिक व भौगोलिक आवश्यकता या बाबींचा विचार केला.
 
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सविस्तरपणे तयार करण्यात आला होता.विद्यापीठ अनुदान आयोगाकडून या अध्यासनाला 1.25 कोटी रुपयांच्या अनुदानासह मंजुरी देण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी दिली.
 
या अध्यासनाच्या निमित्ताने पंडितजींनी मांडलेला अंत्योदय विचार व त्याची अंमलबजावणी विद्यापीठ परिक्षेत्रात केली जाईल. विद्यापीठाचा सार्वजनिक निती निर्धारणात सहभाग वाढावा हे यामागे उद्दिष्ट आहे.दरवर्षी विविध कार्यशाळा, परिसंवाद इ.चे आयोजनही होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@