दुष्काळासाठी केंद्राकडे ७९६२ कोटींचा प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |



मुंबई : राज्यातील विविध भागांत गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल व मदत पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.दुष्काळी परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केंद्राची तीन पथके दोन दिवसांपासून राज्यात आहेत. या पथकाने राज्याच्या विविध भागांचा दौरा करून दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला.

 

गुरुवारी त्या तीनही पथकांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेऊन, दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस राज्याचे महसूल व मदत पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

 

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाकडे ७९६२ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला. त्यातील जास्तीत जास्त निधी लवकरात लवकर मिळावा, अशी आग्रही मागणी राज्य शासनाने केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाकडे गुरुवारच्या बैठकीत केली. केंद्राच्या पथकानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत यावरील सविस्तर अहवाल लवकरच सादर करू, अशी ग्वाही दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@