शेंदुर्णीला जि.प. शाळेत दिव्यांग दिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

शेंदुर्णी, ता.जामनेर : 
 
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार दिलीप टिळेकर, मंडल अधिकारी सुहास कोटे, शेंदुर्णीचे तलाठी एच.एम.नाईक, एस.व्ही.कुमावत यांचे स्वागत एस.टी.बारी यांनी केले.
 
कार्यक्रमांतर्गत यादी भाग क्र.240 चे दिव्यांग मतदार रवींद्र बारी व वंदना बारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
 
प्रास्ताविक शेंदुर्णी केंद्राचे केंद्र प्रमुख कुमावत यांनी तर सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक महेश वाणी यांनी केले.
कार्यक्रमास उर्दू शाळेचे मु. अ. इमरान शेख व गावातील नागरिक उपस्थित होते. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी शालेय पोषण आहाराची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@