नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |
नगरदेवळा  ता.पाचोरा : 
 
येथे कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यावरुन त्यांच्या पथकाने गुरुवार 6 रोजी नगरदेवळा नदीपात्रात जुगार, सट्टा अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले.
 
त्यांच्याकडून 26 हजार 990 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने हस्तगत करुन पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
 
जिल्हाभरात सर्वत्र अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू आहे. अवैध धंद्यांचं माहेरघर बनलेल्या नगरदेवळा येथे सट्टा, जुगार सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता नगरदेवळा येथील अग्नावती नदीपात्रातील कल्याण मटका, जुगार अड्ड्यावर पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, पोलीस नाईक शंकर जंजाळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर पाटील, भगवान पाटील या पथकाने छापा मारुन 3 जणांना ताब्यात घेतले.
 
त्यांच्याजवळून 26,990 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने हस्तगत करुन दिनेश राऊळ, विक्रम गढरी, भीमसिंग राजपूत, राजेंद्र चेडे, रवींद्र भोई, अशोक कोळी सर्व रा. नगरदेवळा यांच्या विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
 
तपास नगरदेवळा दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, नरेंद्र विसपुते करीत आहेत. या कारवाईमुळे अवैधधंदे करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नगरदेवळा दूरक्षेत्र पोलीस करतात तरी काय ?
 
या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव स्वतंत्र पथक पाठवून जर नगरदेवळ्यात अवैध धंद्यांवर कारवाई करतात तर पाचोरा पोलीस स्टेशन व नगरदेवळा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल नगरदेवळ्याच्या नागरिकांमध्ये केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@