वरणगावात प्लास्टीक बंदी; दुकानांमध्ये कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

नूतन मुख्याधिकारी तडवी रुजू होताच मोहिमेला सुरुवात


 
 
वरणगाव : 
 
शहरात नगरपंचायमध्ये गेल्या एक वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्लास्टीक बंदीसाठी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. मुख्याधिकारीपदी बबन तडवी यांची नगरपंचायतमध्ये नियुक्ती झाल्याबरोबर त्यांनी प्लास्टीक बंदीची मोहीम शुकवारी सकाळी 11 वाजेपासून सुरु केली.
 
या मोहिमेत स्वत: मुख्याधिकारी बबन तडवी, पाणी पुरवठा विभागाचे गणेश चाटे, श्रीधर जाधव, आरोग्य विभागाचे दीपक भंगाळे, राजू गायकवाड, संतोष वानखेडे, गौतम इंगळेंसह इतर कर्मचार्‍यांनी भोगावती नदीपासून बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन रोडवरील किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्रेते आदी ठिकाणावरुन प्रत्यक्ष पाहणी करुन ज्याठिकाणी प्लास्टीकच्या पिशव्या आढळल्या अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला.
 
साधारणत: 15 ते 20 जणांवर कारवाई करण्यात आली. नूतन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पदभार स्वीकारताच शहरामध्ये प्लास्टीक पिशव्या ठेवणार्‍या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे शहरवासियांमधून कौतुक होत आहे. तसेच प्लास्टीक बंदीची मोहीम सुुरुच ठेवण्याचीही मागणी होत आहे.
 
मोहिमेत सातत्य हवे; ग्रामस्थांची अपेक्षा
 
कारवाईनंतर दंड नगरपालिकेमध्ये पावतीसह जमा करण्यात आला. या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये प्लास्टीक बंदीबाबत जागृती निर्माण झाली आहे. यापुढे सुध्दा मोहिमेमध्ये सातत्य ठेवले जावे, जेणेकरुन दुकानदार पुन्हा प्लास्टीक पिशव्या ठेवणार नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@