जामनेरात अपंग, मूकबधीर बांधवांचा मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे, पं.स.च्या बीडीओंना दिले निवेदन

 
 
 
जामनेर :
 
अपंग व मूकबधीर बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जागृत अपंग संघटना जामनेरतर्फे शुक्रवारी 7 रोजी तहसील व पंचायत समितीवर धडक मोर्चा धडकला.
 
मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालयात एकत्र येऊन तेथून पंचायत समितीत बीडीओंना निवेदन देऊन तहसील कार्यालयाकडे मोर्चा आला. तेथे नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
 
 
यावेळी जिल्हाध्यक्ष अशपाक बागवान यांनी मूकबधीर बांधव एकत्र आल्याने आभार मानून आपले संघटन नेहमीच आपल्या हक्कासाठी लढणार असल्याचे सांगितले. मूकबधीर बांधवानी देखील खुनांद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भावना पूजा पाटील यांनी समजावून सांगितल्या.
 
संजय गांधी योजनेतून अपंगांना देण्यात येणारे वेतन 600 वरून 2000 करण्यात यावे, बँकेत अनुदानाची येणारी कर्ज प्रकरणे व नवीन स्वयंम रोजगारसाठी उपलब्ध होणारी कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
 
 
यावेळी अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशपाक बागवान, तालुकाध्यक्ष विश्वनाथ सुरळकर, युवराज मगरे,मोहन सुरवाडे, अंबादास चोपडे, कैलास कोळी, गणेश साळुंके, निलेश शिसोदे आदीसह तालुकाभरातून अपंग बांधव उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@