जळगावकर प्रामाणिक अन् प्रेमळ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

तिबेटी स्वेटर विक्रेते तेझीन यांचा ‘तरुण भारत’शी संवाद


 
 
जळगाव : 
 
जळगावकर हे व्यवहाराला चांगले असून प्रेमळही आहेत, असा अनुभव व्यक्त केला आहे, येथे हिवाळ्यात उबदार कपडेविक्रीसाठी येणार्‍या तिबेटी बांधवांनी. एकाने तर जळगावकरांबाबत ‘ बडे अच्छे है यहाँ के लोग!’ असे उत्स्फूर्त उद्गारही काढले.
 
 
दरवर्षी थंडीत म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यात उबदार कपडे विक्रीसाठी तिबेटमधृन अनेक व्यावसायिक जळगावला येत असतात. त्यापैकी काही जणांचे 50 वर्षांपासून जळगावकरांशी नाते जुळलेले आहे.
 
दरवर्षी हे व्यावसायिक नवीन आकर्षक स्वेटर व अन्ळ उबदार कपडे विक्रीसाठी आणतात, अशी माहिती स्वेटर विक्रेते तेझीन यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना दिली.
 
थंडीत चार महिन्यात जी.एस.ग्राउंडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास लागून दुकाने थाटतात. तिबेट व्यावसायकांची ही 15 दुकाने आहेत. सकाळी 8.30 वाजेपासून ते रात्रीचे 10 पर्यंत दुकाने सुरु असतात.
 
यातील 15 कुटुंब नवीन बसस्थानक परिसरात वास्तव्यास असतात. काही तिबेट व्यापारी 40 ते 50 वर्षांपासून जळगावला येतात. व्यवहारासंबंधी जळगावकर अत्यंत प्रामाणिक असल्याची भावना तेझीन यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
लहान मुलांसापासून ते वयोवद्धांसाठी जॉकेट, स्वेटर, हाताचे - पायाचे मोजे, टोपी, चादर, उबदार शर्ट आहेत. महिलांमध्ये फॅन्सी स्वेटरचे आकर्षण असते. 400 ते 1500 पर्यंत जॅकेट विक्री करण्यात येते.
 
 
ग्राहकांचा गुणवत्तेकडे ( क्लॉलिटीकडे) जास्त कल असतो. स्थानिक आणि तिबेटी विक्रेत्यांकडील मालाच्या गुणवत्तेत आमच्याकडे सरसता अधिक असल्यामुळे स्थानिक व्यापारीही आमच्याकडे खरेदीसाठी येतात, असेही तेझीन हे सांगतात.
 
 
तिबेट व्यावसायिक कमी शिकलेले असतात. त्याच्याकडील माल हा भारतात प्रामुख्याने पंजाबात तयार होतो. काही जणांचा जन्म जळगावचा आहे.
 
 
त्यामुळे साहजिकच त्यांना जळगावबाबत ओढ आणि स्थानिकांशी चांगले नाते आहे. थंडीचे चार महिने झाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परत जातात. निम्मे जण शेती करतात आणि अन्य छोटे-मोठे व्यवसाय करीत असतात.
@@AUTHORINFO_V1@@