पुण्यातील हॉटेलमध्ये मिळणार अर्धा ग्लास पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 


 
  
पुणे : पुणेकरांना येणाऱ्या काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. या दिशेने पाऊल उचलत पुण्यातील हॉटेल मालकांनी ग्राहकांना फक्त अर्धा ग्लास पाणी देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल. असे हॉटेल मालकांना वाटते.
 

हॉटेलमध्येही पाण्याचा अपव्यय केला जातो. हॉटेलमध्ये ग्राहकांना गेल्यावर लगेच पहिल्यांदा पाणी दिले जाते. काही ग्राहक ग्लासमधील पाणी अर्धे पितात आणि अर्धे वाया घालवतात. हे लक्षात घेऊन पुण्यातील काही हॉटेल मालकांनी ग्राहकांना अर्धा ग्लासच पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्राहकांनी मागितले तरच पाणी दिले जाणार आहे.

 

पुणेकरांनी हॉटेल मालकांच्या या निर्णयाचे स्वागत केले. मुठा नदीच्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे पुणेकरांना ही पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना पाण्याची काटकसर करण्यास सांगितले आहे. पाण्याची काटकरसर केली नाही तर पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यात पुण्यामध्ये एकदिवसआड पाणीपुरवठा करावा लागेल. असे गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@