भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी: डॉ. देवसरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 
 
भुसावळ : 
 
भारतीय उत्पादन क्षेत्रात सध्याच्या काळात आमुलाग्र बदलाची गरज आहे कारण गेल्या तीन दशकात बदलासाठी तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अधोरेखित करतानाच बदलाची ही गती मंदावणार नाही.
 
या क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी चालून आली आहे फक्त सामान्य माणसाच्या हितासाठी काम केले पाहिजे. तसेच कौशल्य विकासाचे धडे गिरवतांना प्रॉडक्ट उत्पादनातील छोट्या-छोट्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ. एस. बी. देवसरकर यांनी येथे प्राध्यापकांच्या कार्यशाळेत केले.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्राध्यापकांसाठी श्री संत गाडगेबाबा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित पाचव्या एफडीपी (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यशाळेत ते बोलत होते. 7 रोजी सुरू झालेली ही कार्यशाळा 11 डिसेंबर रोजी समाप्त होईल.
 
 
कार्यक्रमासाठी डीबीएटीयू लोणेरे येथील समन्वयक डॉ. नीरज अग्रवाल, अभ्यास समन्वयक प्रा. एस. यू. वायकर, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, ऑटोडेस्कचे एक्स्पर्ट ऋषिकेश सावंत, डीन प्रा. डॉ. राहुल बारजिभे व विभागप्रमुख उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@