राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडले मतदान यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 


 
 
शाहाबाद : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर रस्त्यावर एक मतदान यंत्र सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवडणुक आयोगाने दोन निवडणुक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील शाहाबाद येथील रस्त्यावर हे मतदान यंत्र सापडले. हा विभाग किशनगंज विधानसभा मतदारसंघात मोडतो.
 
 
अब्दुल रफिक आणि नवल सिंह पटवारी असे या दोन निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. रात्री उशिरा अध्यादेश काढून या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे. अशातच हा प्रकार घडल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. रस्त्यावर सापडलेल्या या मतदान यंत्राचा वापर मतदानासाठी झाला होता का? की हे मतदान यंत्र राखीव यंत्रांपैकी एक होते. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
 

राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावे. असा अंदाज तेथील जिल्हाधिकारी एस.पी सिंह यांनी व्यक्त केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. राजस्थानमध्ये एकूण ७२.७ टक्के मतदान झाले. विधानसभा निवडणूकीसाठी राजस्थानमध्ये एकूण २२७४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी राजस्थानमध्ये ५२ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या मतदानात २ लाख मतदान यंत्रांचा आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला होता. याच महिन्यात ११ डिसेंबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@