चाळीसगाव तालुका पाणीदार करणार : आ.उन्मेष पाटीलअभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |
 
चाळीसगाव तालुका पाणीदार करणार : आ.उन्मेष पाटील
अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाऊंडेशनचा उपक्रम
 
चाळीसगाव, ८ डिसेंबर
सन २०१६ पासून राज्यात अभिनेता आमिर खान यांच्या मार्गदर्शनाने आजवर ७५ तालुक्यामधून गाव पाणीदार करण्याची चळवळ सुरू झाल्याने सर्व गावे पाणीदार झाली आहेत. जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्याचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत समावेश झाल्याने चाळीसगाव तालुका पाणीदार करून राज्यात पहिल्या क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून ही चळवळ जोमाने पुढे नेण्याचे आवाहन आ.उन्मेष पाटील यांनी केले .
 
अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या पानी फाऊंडेशनच्या वतीने , तहसीलदार, कृषी विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हंस चित्रपट गृहात पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुक्यात कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार कैलास देवरे, जि.प. सभापती पोपट तात्या भोळे , उपसभापती संजय पाटील, राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन तालुका समन्वयक विजय कोळी , सुनील पाटील यांनी केले
यांची होती उपस्थिती
तहसीलदार कैलास देवरे , जि.प. शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, तालुका गटविकास अधिकारी अतुल पाटील, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, पं.स. सदस्य दिनेश बोरसे, भाऊसाहेब पाटील, नगरसेवक संजय पाटील, पानी फाऊंडेशन जिल्हा समन्वयक विकास गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@