पतीच्या खात्याची माहिती पत्नीला, बँकेला दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
अहमदाबाद : पतीच्या बँक खात्याची माहिती त्याच्या पत्नीला दिल्यामुळे एका बँकेला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. बँकेने पतीच्या परवानगीशिवाय त्याच्या बँक खात्याची माहिती पत्नीला दिली होती. ग्राहक तक्रार निवारण मंचाने याप्रकरणी संबंधित बँकेला खडसावले असून त्या ग्राहकाला बँकेने दहा हजार रुपये द्यावेत. असा आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने बँकेला दिला आहे.
 

इंडियन ओव्हरसीज बँक असे या बँकेचे नाव आहे. अहमदाबादमधील या बँकेच्या स्थानिक शाखेत दिनेश पमनानी यांचे खाते आहे. बँकेने कोणतीही आगाऊ सूचना न देता दिनेश पमनानी यांच्या बँक खात्याची माहिती बँकेने पमनानी यांच्या पत्नीला दिली. याप्रकरणी दिनेश पमनानी यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती. या तक्रारची दखल घेत ग्राहक तक्रार निवारण मंचाने बँकेला सुनावले.

 

दिनेश पमनानी यांचा पत्नीसोबतचा वाद सध्या कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. अशावेळी दिनेश यांची पत्नी बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करून ती माहिती न्यायालयात सादर करू शकते. असे दिनेश पमनानी यांचे म्हणणे आहे. ६ मे २०१७ दिनेश पमनानी यांच्या मोबाईलवर बँकेने एक एसएमएस पाठवला होता.

 

दिनेश यांच्या बँक खात्यातील १०३ रुपये कापल्याचा उल्लेख या एसएमएसमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी दिनेश यांनी बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तुमच्या पत्नीने तुमचे बँक स्टेटमेंट घेतल्याने तुम्हाला हे शुल्क आकारण्यात आले आहे. असे दिनेश यांना बँकेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे दिनेश पमनानी यांनी बँकेविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@