राहुल गांधीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी हैदराबाद येथे एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. ही मुलाखत पेड न्यूजचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारची पेड न्यूज देऊन राहुल गांधींनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केला आहे.
 

राहुल गांधी यांनी ही मुलाखत ६ डिसेंबर रोजी एका वृत्तसंस्थेला दिली होती. या पेड न्यूजद्वारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे नकवी यांनी म्हटले आहे. नकवी यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी या मुलाखतीत एका सर्वेक्षणाचा हवाला दिला होता.

 

या सर्वेक्षणानुसार पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. ही मुलाखत पेड न्यूजच्या प्रकारात येते. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी कोणीही निवडणूक प्रचार करू शकत नाही. तसेच मुलाखत देऊ शकत नाही. असा नियम आहे. परंतु राहुल गांधी यांनी मुद्दाम अशाप्रकारे मुलाखत देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप नकवी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@