भावसार ट्रस्टचे खोटे कागदपत्रे बनविणार्‍या 16 जणांवर गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

यावल न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

 
फैजपूर : 
 
येथील भावसार समस्त पंच व श्री भावसार क्षत्रिय समाज मंदिर ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे खोटे शिक्के व प्रोसिडिंग बुक बनवून त्या आधारे जळगाव येथील धर्मदाय आयुक्तांकडे आम्हीच खरे ट्रस्टी व अध्यक्ष असल्याची बतावणी करुन नवीन कार्यकारिणी घोषित झाली होती.
 
याप्रकरणी मूळ ट्रस्टी व अध्यक्षांनी यावल न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्यावर यावल न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने फैजपूर पोलिसांनी 23 नोव्हेंबरला 16 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
येथील भावसार समस्त पंच व भावसार क्षत्रिय समाज मंदिर ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे सन 2005 पासून योगेश वसंत भावसार हे अध्यक्ष आहेत. मूळ दप्तर व रेकॉर्ड त्यांचेजवळ आहे.
 
तरीही अतुल भावसार, प्रवीण भावसार, संतोष भावसार, ललित भावसार, संतोष भावसार, अमित भावसार, ऋषील गोवे, नंदकिशोर सोमवंशी, किसन भावसार, सुनील गोवे, गजानन गोवे, पुंडलिक महाराज, सुभाष मगरे, प्रज्ञेश गोवे यांनी दोन्ही संस्थांचे खोटे शिक्के व प्रोसिडिंग बुक बनवून ट्रस्टच्या मालकीच्या मिळकतीवर नाव लावण्यासाठी अर्ज दिले.
 
 
ट्रस्टच्या मालकीचे मंदिरातील दानपेटीमधील रोकड परस्पर काढून घेतली. या सबबीवरून ट्रस्टचे अध्यक्ष योगेश भावसार यांनी यावल न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@