पाचोरा येथून तरूण बेपत्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

 
 
पाचोरा :
 
येथील रेल्वे कॉलोनी वसाहतीतील नाना बाळू हांडे (33) हा विवाहित तरुण आपल्या राहत्या घरून घरात कुणास काही न सांगता निघून गेला आहे. 2016 पासून बेपत्ता झाला आहे.
 
त्याचा रंग सावळा असून उंची 5फूट10इंच असून त्याच्या उजव्या हाताच्या कामेवर नाना असे नाव गोंधले आहे. डोळे, नाक सरळ, डोक्याचे केस काळे असें वर्णन आहे.
 
तो कुठे आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशनच्या 02596-240133 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
बेपत्ता इसमाची पत्नी पुष्पा नाना हांडे (28) रा . वंजारवाडी ता.नांदगाव जि.नाशिक यांनी खबर दिल्यावरून पाचोरा पोलीसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.. काँ. प्रकाश गोकुळ पाटील करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@