पिण्यासाठी पाणी अन् गुरांसाठी मिळेना चारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

पारोळा तालुक्यात शेतकर्‍यांनी दुष्काळ पाहणी पथकाकडे मांडल्या व्यथा

 
 
पारोळा : 
 
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही. थोडे पार पिक हाती आले असते पण बोंड अळीने तोंडचा घास पळविला अशा परिस्थितीत सरकारकडून येणारी बोंड अळीची तुटपुंजी मदतही अद्याप मिळाली नाही. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली आलेला शेतकरी हताश झाला आहे, अशा व्यथा पारोळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी केंद्रीय समितीच्या पथकापुढे मांडल्या.
 
6 रोजी सकाळी 11 वाजता दगडी सबगव्हान ता. पारोळा या दुष्काळी गावाला केंद्रीय समितीच्या पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छवी झा, डीपाटमेंट ऑफ पल्ससचे संचालक ए. के.तिवारी एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता. या सदस्यांनी या दगडी सबगव्हान गावाची दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत शेतकर्‍यांशी संवाद साधला.
 
या गावातील बाळू नथा पाटील व नारायण श्रीराम पाटील या शेतकर्‍यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी नारायण पाटील यांना शेतात किती कापूस पिकला, त्याला खर्च किती आला, कापूस कुठे विकला, किती पैसे मिळाले असे प्रश्न केले. यावेळी हेक्टरी 1 क्विंटल कापूस आल्याचे शेतकर्‍याने सांगितले.
 
यानंतर बाळू नथा पाटील यांना कापूसच पीक का घेता असे पथकाने विचारले असता विकासोचे घेतलेले कर्ज फेड फक्त कापूस उत्त्पन्न घेतल्यावर होते असे सांगितले.
 
यावेळी शासनाने आम्हाला बी बियाणे, रासायनिक खते, यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे असे सांगितले. सरपंच संगीता पाटील यांनी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे .त्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजे अशी मागणी या पथकाकडे केली तर गावात रोहयो ची कामे सुरू झाली पाहिजे असे निवेदन दिले.
 
दुष्काळी स्थितीमुळे तो नैराश्याने ग्रस्त झाला आहे. मग या कर्जबाजारीपणाला कंटाळून तो आत्महत्याकडे वळतो, असे या गावातील माजी सरपंच काळू पाटील यांनी सांगितले.
 
या पथकासमवेत जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी विजयनंद शर्मा, अमळनेर प्रांत अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, कृषी सहायक संचालक रमेश भताने, निवासी नायब तहसीलदार पंकज पाटील, गटविकास अधिकारी आर. के. गिरासे, कृषी अधिकारी एस.पी. तवर, विस्तार अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@