गाडी न थांबविल्याने पोलीस- भाजपा पदाधिकार्‍यात हाणामारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

तिघांना अटक, पोलीस निरीक्षकाचा अपमान, आ. हरिभाऊ जावळे, उदय वाघ पोलीस ठाण्यात


 
चोपडा : 
 
चोपडा शहरातील शिवाजी चौकात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची चार चाकी कार (एमएच 19 सीएफ 3493) तपासणीसाठी व सीटबेल्ट न लावण्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी अडवली असता न थांबल्याने शहर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन बाजार समितीमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची कार अडवल्याचा राग येवून पाटील यांनी पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडण्याचा प्रकार घडला. सकाळी 11.30 ते 12 वाजेच्यादरम्यान घडली.
 
वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विजय निकम व नरेंद्र पाटील यांच्यात बाचाबाची सुरू झाली. तेव्हा नरेंद्र पाटील यांनी भाजपाचे माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा यांना भ्रमणध्वनी करून घटनास्थळी बोलावले तर विजय निकम यांनी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना ही घटना सांगितली.
 
किसनराव पाटील हे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता नरेंद्र पाटील व अनिल उर्फ राजू शर्मा यांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. त्यात राजू शर्मा यांनी निरीक्षकांनी कॉलर पकडल्याने पोलिसांनी त्या दोघांना जोरदार चोप दिला. पोलीस निरीक्षकही जखमी झाले.
 
 
घटनेचे वृत्त शहरात व तालुक्यात पसरल्याने पोलीस स्टेशनला गर्दी झाली. काही अपप्रकार घडू नये म्हणून किसनराव पाटील यांनी एसआरपी प्लाटूनची एक तुकडी बोलवून शहर पोलीस स्टेशनवरील गर्दी पांगवली.
 
 
स्टेशन आवारात आरोपींना अटक करण्यास अडथळा आणत शिवीगाळ केल्याबद्दल मनिष पारिख यांच्यासह नरेंद्र पाटील आणि अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा यांना अटक करण्यात आली.
 
 
याप्रकरणी तिघांविरोधात पो.काँ.विजय निकम यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 176/18 भा.दं.वि. कलम 353, 332, 225, 186, 323, 504, 506 प्रमाणे नरेंद्र पाटील, अनिल उर्फ राजू शर्मा आणि मनिष पारिख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक किसनराव पाटील हे करीत आहेत.
किसन नजनपाटील पोलिसातील गुंडा ;  उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजप
 
सीटबेल्ट न लावल्याने त्यावर कायदेशीर कारवाई न करता पूर्ववैमानस्यातून पोलीस निरीक्षकांनी अकारण अमानुष मारहाण केली. पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था ठेवणे असताना नजन पाटील यांच्या कार्यकाळात गुन्हेगीरी वाढली आहे.
 
ते गुंडगिरी करीत असून सामान्य माणूस त्यांच्या जाचाला कंटाळलो आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्यास सांगून योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन देणार आहोत.
कायदा सर्वश्रेष्ठ :  पोलीस निरीक्षक
 
माझा कोणत्याही राजकीय पक्ष, व्यक्तीविरुद्ध द्वेष नाही. कायदा न पाळणारा कोणीही असो त्याला कायद्याचा बडगा दाखवला जाईल. या कारवाईचा राग येऊन जर कोणी माझी बदलीची मागणी करीत असेल तर मला त्याची चिंता नाही पण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला मी सोडणार नाही, असे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@